सांख्यिकी

वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य

views

04:59
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य: जेव्हा प्राप्तांकांची संख्या मोठी असते तेव्हा वरील सूत्रात सर्व संख्या लिहून बेरीज करणे जिकिरीचे होते. त्यासाठी आपण अन्य काही पद्धतींचा वापर करतो. कधी कधी मोठ्या प्रमाणात केलेल्या प्रयोगाची सामग्री वर्गीकृत सारणीत दिलेली असते. अशा वेळी सांख्यिक माहिती तपासण्याच्या संख्यांचा मध्य अचूक काढता येत नाही, म्हणून त्याच्या जवळपासची संख्या काढण्याची किंवा अंदाजे मध्य काढण्याची रीत आहे. तिला सरळ पद्धती असे म्हणतात.