सांख्यिकी

वृत्तालेख काढणे

views

04:06
वृत्तालेख काढणे: काढलेल्या वृत्तलेखावरून माहिती कशी वाचायची हे आपण पहिले. आता वृत्तालेख कसा काढतात, ते आपण पाहू. 1) वृत्तालेख काढताना संपूर्ण वर्तुळाची विभागणी प्रमाणबद्ध वर्तुळपाकळ्यांत करतात. 2) प्रत्येक घटकाशी संबंधित वर्तुळपाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप खालील सूत्राने काढतात. वर्तुळपाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप θ = (त्या घटकातील संख्या)/(सर्व घटकांतील एकूण संख्या) × 360 योग्य त्रिज्येचे वर्तुळ काढून, सामग्रीत जेवढे घटक आहेत तेवढ्या वर्तुळपाकळ्यांत वर्तुळाचे विभाजन करतात. वृत्तालेख काढण्याची कृती खालील उदाहरणातून समजून घेऊ.