अवकाश मोहिमा

अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व

views

04:20
मानवाला आकाश व अवकाशाबद्दल नेहमीच आकर्षण राहिले आहे. सुरुवातीस पृथ्वीवरून दुर्बिणीच्या साहाय्याने मानवाने अवकाश निरीक्षणाची सुरुवात केली. त्यानंतर दुर्बीण व इतर उपकरणे असणारे कृत्रिम उपग्रह मानवाने अवकाशात पाठवले. मानव इतके करून थांबला नाही. तर त्याने त्यापुढील टप्प्यात पृथ्वीकक्षेत तसेच पृथ्वीकक्षेच्या पलीकडेही दूरवर अवकाश मोहिमा हाती घेतल्या आणि सौरमाला, सौरमालेची निर्मिती, उत्क्रांती याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. मानव स्वत: अंतराळ प्रवास करू लागला.