अवकाश मोहिमा Go Back कक्षांचे वर्गीकरण: 1) उच्च कक्षा (High Earth Orbits) views 03:55 ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासून उंची 35,780km किंवा त्यापेक्षा जास्त असते त्या कक्षांना उच्च कक्षा म्हणतात. भूपृष्ठापासून 35,780km एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास 24 तास लागतात. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला सुद्धा स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. या उपग्रहाची कक्षा जर विषुववृत्ताला समांतर असेल तर, पृथ्वीला स्वत:भोवती परिवलन करण्यास लागणारा कालावधी आणि उपग्रहाला पृथ्वीभोवती परिभ्रमण करण्यास लागणारा कालावधी एकच असल्याने पृथ्वीच्या सापेक्ष हा उपग्रह अवकाशात जणू काही स्थिर आहे असा भास होतो. प्रस्तावना माहिती आहे का तुम्हांला? अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व उपग्रहांचे प्रकार कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा कक्षांचे वर्गीकरण: 1) उच्च कक्षा (High Earth Orbits) सोडवलेली उदाहरणे उदा 1 आणि 2 उपग्रह प्रक्षेपक पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा चंद्रमोहिमा भारत व अवकाश तंत्रज्ञान