अवकाश मोहिमा

भारत व अवकाश तंत्रज्ञान

views

04:16
अवकाश संशोधनात व अवकाश मोहिमा राबविण्यात अग्रेसर अशा जगातील काही मोजक्या देशांत भारतही समाविष्ट आहे. भारतानेही प्रक्षेपकाच्या विज्ञान व तंत्रज्ञानात खूप अभिमानास्पद प्रगती केलेली आहे. अवकाश मोहिमा राबविण्यात भारत देश स्वयंपूर्ण झाला आहे. भारताच्या अंतराळ संशोधनाचा पाया डॉ. विक्रम साराभाई यांनी घातला. ISRO ने विविध प्रक्षेपक बनवले असून 2500kg वस्तुमानापर्यंत उपग्रह अवकाशात नेऊन सर्व प्रकारच्या कक्षांमध्ये स्थापित करण्याचे कौशल्य व क्षमता आता ISRO मध्ये आहे. ISRO ने PSLV (Polar Satellite Launch Vehicle) आणि GSLV (Geo Synchronous Satellite Launch Vehicle) हे दोन प्रमुख प्रक्षेपक तयार केले असून ते अनेक टप्पे असणारे प्रक्षेपक आहेत.