अवकाश मोहिमा

चंद्रमोहिमा

views

05:43
ज्या खगोलीय वस्तूवर माणसाने पाऊल ठेवले आहे, अशी चंद्र ही एकमेव खगोलीय वस्तू आहे. चंद्र आपल्या सर्वात जवळची खगोलीय वस्तू असल्यामुळे सूर्यमालेतील घटकांकडे पाठवलेल्या मोहिमांमध्ये चंद्र मोहिमा या सर्वात पहिल्या अंतराळ मोहिमा होत्या. सोव्हियत युनियनने पाठवलेली लूना मालिकेतील अवकाशयाने चंद्रावर पोहोचली. तसेच अशा मोहिमा आजपर्यंत अमेरिका, युरोपियन देश, चीन, जपान व भारताद्वारे राबविल्या गेल्या आहेत. लूना – 2 हे अंतराळयान सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर धडकले. तसेच लूना-3 या यानाने चंद्राच्या दुसऱ्या बाजूची सर्वप्रथम छायाचित्रे घेतली. ही तिन्ही याने सोव्हियत संघाने 1959 साली सोडली. 1966 साली चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले अंतराळयान हे लूना -9 होते. तसेच लूना 10 ने चंद्राला सर्वप्रथम प्रदक्षिणा घातल्या.