अवकाश मोहिमा

पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा

views

03:16
मानवाने आजपर्यंत हाती घेतलेल्या अनेक अवकाश मोहिमा आहेत. त्यांपैकी आज आपण काही मोहिमांविषयी माहिती करून घेऊ या. मानवाने आजपर्यंत अनेक कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवले आहेत. हे उपग्रह विविध प्रकारचे असून त्यामुळे दळणवळण, आपत्ती व्यवस्थापन, साधन संपत्ती व्यवस्थापन इत्यादींबाबत माहिती संकलित केली जाते. या अवकाश मोहिमांमुळे मानवाचे पृथ्वीवरील जीवन सुखकर झाले आहे. त्याचप्रमाणे काही अवकाश मोहिमा विश्वाविषयीचे आपले ज्ञान वाढविण्यासाठी राबविल्या जातात. यात अवकाशयाने सौरमंडलातील इतर घटकांचे निरीक्षण करण्यासाठी वापरली जातात. अशा मोहिमांतून नवीन माहिती समोर आली असून सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीला समजून घेण्यात प्रगती झाली आहे.