धाराविद्युत

विभवांतर

views

3:05
आता आपण विभव आणि विभवांतर या घटकांची माहिती घेऊ. ‘’एखाद्या वस्तूमधील विद्युत प्रभाराच्या पातळीला ‘विद्युत विभव’ असे म्हणतात. धनविद्युत प्रभार हा अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होत असतो. विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे निर्माण होतो. इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून जास्त विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतात. उदाहरणार्थ. आकाशातून पडणारी वीज म्हणजे कमी विभव असलेल्या ढगांतून अधिक विभव असलेल्या जमिनीपर्यत येणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह असतो. म्हणजेच “दोन वस्तूंवरील अथवा दोन बिंदूंमधील विभवांच्या फरकास ‘विभवांतर’ असे म्हणतात”.