धाराविद्युत

ओहमचा नियम व रोधकता

views

3:26
आता आपण ओहमचा नियम व रोधकता यांची काही उदाहरणे सोडवूया.. दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध 1000 ᾩ ओहम आहे. जर 230V व्होल्ट (विभवांतराच्या) स्त्रोतापासून या दिव्याला विद्युतधारा पुरवली जात असेल तर तारेच्या कुंडलातून वाहणारी विद्युतधारा किती असेल? पहा मुलांनो, या उदाहरणामध्ये रोध व विभवांतर दिले आहे. रोध R = 1000 ᾩ ओहम आणि विभवांतर V = 230V व्होल्ट दिले आहे. आता आपण विद्युत धारेच्या सूत्रात किमती लिहू. विद्युतधारा I = ( विभवांतर V)/(रोध R) I = 230V/(1000 ᾩ ओहम ) = 0.23A अॅम्पिअर. म्हणून दिव्यातील तारेच्या कुंडलातून वाहणारी विद्युतधारा = 0.23A अॅम्पिअर इतकी आहे.