धाराविद्युत

वाहक आणि विसंवाहक

views

4:26
आता आपण वाहक व विसंवाहक म्हणजे काय ते पाहूया. आपण सर्व पदार्थांची विद्युतवाहक आणि विसंवाहक अशी विभागणी करू शकतो. विद्युत वाहक म्हणजेच सुवाहक तर विसंवाहक म्हणजे दुर्वाहक होय. पदार्थाचे सुवाहकता व दुर्वाहकता हे गुणधर्म आहेत ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी असते त्या पदार्थाला वाहक असे म्हणतात. उदा. चांदी, तांबे, ॲल्युमिनिअम हे उत्तम वाहक आहेत. यांच्यातून सहजतेने विद्युतधारा वाहू शकते. म्हणून विद्युत वेष्टणाच्या आतमधील तारा -तांबे, किंवा ॲल्युमिनिअम यांनी बनलेल्या असतात. ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते, म्हणजेच ज्यामधून विद्युतधारा वाहूच शकत नाही, अशा पदार्थांना विसंवाहक म्हणतात. उदाहरणार्थ. लाकूड, काच, रबर, इत्यादी पदार्थांतून विद्युतधारा वाहत नाही. हे सर्व पदार्थ हे वाहक किंवा विसंवाहक असतात. पदार्थांचे वाहक किंवा विसंवाहक असणे हे पदार्थाच्या रचनेवर अवलंबून असते. पदार्थात जवळजवळ मुक्तपणे फिरू शकणारे विद्युतप्रभार (इलेक्ट्रोन) असल्यास पदार्थ विद्युक सुवाहक असतो, तर त्यात असे विद्युत प्रभार नसल्यास पदार्थ विद्युत विसंवाहक असतो.