धाराविद्युत

विद्युत रोध (Resistance) आणि ओहमचा नियम

views

3:25
विद्युतरोध प्रवाहास अडथळा निर्माण करण्याच्या वाहकाच्या गुणधर्मास ‘विद्युतरोध’ असे म्हणतात. तर अंकगणितीय दृष्टिकोनातून विद्युत रोध म्हणजे वाहकाच्या टोकांतील विद्युत विभवांतर आणि वाहकातून जाणारी विद्युतधारा यांचे गुणोत्तर होय. ‘’ओहम’ (ohm) हे विद्युत रोधाचे एकक आहे. व ते ᾩ या चिन्हाने दर्शवतात. रोध मोजल्यास तो ओहम (ohm) या एककात मोजतात व तो खालील सूत्राने दाखवतात. (1 व्होल्ट (V))/(1 अॅम्पिअर (A)) = 1 ओहम (ᾩ) वाहकातून प्रवाहित होणारी विद्युतधारा (I) व त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (V) यांच्यामध्ये असणारा संबंध जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार काढता येतो. ’जर वाहकाची भौतिक अवस्था कायम असेल तर वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (v) व वाहकातून जाणारी विद्युतधारा (I) यांचे गुणोत्तर स्थिर असते.’’ म्हणजेच वाहकाची भौतिक अवस्था कायम असेल तर वाह्कामधून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते.