धाराविद्युत

घरगुती विद्युत जोडणी

views

4:24
आता आपण घरगुती विद्युत जोडणीविषयी माहिती घेऊ. आपल्या घरातील विद्युतधारा ही मुख्य विद्युतवाहक तारेतून किंवा जमिनीखालून तारांद्वारे किंवा खांबावरील तारांमधून आणली जाते. ही विद्युत दोन तारांमधून आणली जाते. एक तार लाल रंगाची असते त्या तारेलाच आपण ‘वीजयुक्त’(live) तार असे म्हणतो. ही तार विसंवाहक आवरणाची असते. तर दुसरी तार काळ्या रंगाची असते त्या तारेलाच आपण ‘तटस्थ तार’ (Neutral) असे म्हणतो. ही काळ्या रंगाच्या रोधी आवरणाची असते. भारतात या दोन्ही तारांमधील विद्युत विभवांतर 220 V इतके असते. या दोन्ही तारा घरातील विद्युत मीटरला मुख्य वितळतारेद्वारे (Main fuse) जोडलेल्या असतात. मुख्य कळद्वारे (Main Switch) या तारा घरातील सर्व वाहकतारांना जोडल्या जातात. आपल्या घरात प्रत्येक खोलीत वीज मिळेल याप्रमाणे या वीजवाहक तारांची जोडणी केलेली असते. प्रत्येक स्वतंत्र परिपथामध्ये वीजयुक्त आणि तटस्थ तारेच्या दरम्यान वेगवेगळी उपकरणे जोडलेली असतात. प्रत्येक उपकरणाला समांतर जोडणीने विभवांतर पुरवले जाते. या दोन तारांच्या व्यतिरिक्त तिसरी तार ही पिवळ्या रंगाची असते. ही तार भूसंपर्कन असते व ती जमिनीत एका धातुपट्टीला जोडलेली असते. ही तार सुरक्षेसाठी वापरलेली असते.