धाराविद्युत

वाहकाचा रोध व रोधकता

views

3:00
आता आपण वाहकाचा रोध व रोधकता याविषयी माहिती घेऊ. वाहकाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त केले असता हे इलेक्ट्रान्स कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जाऊ लागतात. अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहामुळे विद्युतधारा निर्माण होते. गतिमान इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवर आदळतात. अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉन्सच्या गतीला अडथळा निर्माण होतो व विद्युतधारेस विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध असे म्हणतात. विशिष्ट तापमानास वाहकाचा रोध (R) हा वाहकपदार्थ (material), वाहकाची लांबी (L), व काटछेदी क्षेत्रफळ (A) या गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणजेच, ‘’एकक लांबी व एकक काटछेदी क्षेत्रफळ असणाऱ्या वाहकाच्या रोधास त्या वाहकाची रोधकता असे म्हणतात.’’