धाराविद्युत

रोधांची जोडणी आणि परिणामी रोध

views

4:39
आता आपण रोधांची जोडणी आणि परिणामी रोध या विषयी माहिती घेऊया. (Resistivity) रोधकता हा पदार्थाचा गुणधर्म आहे. मात्र तापमानात बदल झाला की रोधकतेमध्ये बदल होतो. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की रोधकता पदार्थाच्या तापमानावर अवलंबून असते. तापमानात वाढ झाल्यास रोधकतेमध्ये वाढ होते. उपकरणांमध्ये गरजेनुसार रोध वेगवेगळ्या प्रकारे जोडलेले असतात. हे जोडलेले रोध ओहमच्या नियमानुसार कार्य करतात. परिपथातील R1, R2, आणि R3 हे तीन रोध प्रत्येकाची टोके एकास एक जोडली जातील असे जोडले आहेत. अशी रोधाची टोके एकमेकांना जोडली असल्यास त्याला रोधाची एकसर जोडणी असे म्हणतात रोध जर एकसर जोडणीत जोडले असतील तर. 1. प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. 2. परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजेइतका असतो. 3. जोडणीच्या दोन टोकांतील विभवांतर प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतरांच्या बेरजेइतके असते . 4. रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा प्रत्येक जोडणीतील रोधापेक्षा जास्त असतो. 5. एकसर जोडणी परिपथातील रोध वाढविण्यासाठी वापरतात. मात्र या एकसर जोडणीलाही काही मर्यादा आहेत. एकसर जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते. त्यामुळे एक घटक जरी काम करत नसेल तर परिपथ खंडित होतो व विद्युतधारा वाहत नाही. जर दोन बल्ब एकसर जोडणीने जोडले तर ते कमी प्रकाश देतात. पण हेच बल्ब एक-एकटे लावले तर ते जास्त प्रकाश देतात. यावरून आपण असे म्हणतो की विद्युतधारा ही एका घटकातून जास्त प्रवाहित होऊन प्रकाश देते.