प्रकाशाचे परावर्तन

प्रस्तावना

views

3:44
आपल्या जीवनात प्रकाशाला खूप महत्त्व आहे. प्रकाशामुळे आपण सृष्टीतील घटक डोळ्यांनी पाहू शकतो. वनस्पतीला स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. मानवाच्या आरोग्यासाठी सूर्यप्रकाशाची मदत होते. विदयुत चुंबकीय प्रारणामुळे आपल्याला वस्तू दिसतात, या प्रारणास प्रकाश असे म्हणतात. विदयुत चुंबकाची प्रारणे 4x10-7m ते 7x10-7m तरंगलांबी असणारी असतात. त्यामुळेच आपल्याला सभोवतालच्या वस्तू दिसतात. सूर्योदय, इंद्रधनुष्य, सूर्यास्त, हिरवीगार झाडे, फुले, आकाश तसेच अंधारात चमकणारे तारे हे सगळे आपण प्रकाशाच्या अस्तित्वामुळे पाहू शकतो. म्हणूनच प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विदयुत चुंबकीय प्रारणे होत. आपल्या सभोवताली असणाऱ्या विविध प्रकारच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होत असते. तर आता तुम्ही मला प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय ते सांगा