कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

प्रस्तावना

views

4:35
निसर्गात कार्बन खूप मोठया प्रमाणात आढळतो. कार्बन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. निसर्गामध्ये कार्बन चुनखडीच्या स्वरूपात आढळतो. हिरा व ग्रॅफाइट ही दोन कार्बनची अपरूपे आहेत. मूलद्रव्यांविषयी माहिती या अगोदरच तुम्ही अभ्यासली आहे. तर आता मला सांगा मूलद्रव्य म्हणजे काय ? मूलद्रव्यांचे विविध प्रकार कोणते? ज्या पदार्थाचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने विघटन करता येत नाही त्या पदार्थाला मूलद्रव्य म्हणतात. मूलद्रव्याचे धातू, अधातू व धातूसदृश असे तीन प्रकार आहेत. मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही. पदार्थाचे लहान कण म्हणजे रेणू. ज्या पदार्थाच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. मूलद्रव्याचे धातू, अधातू व धातुसदृश हे प्रकार आहेत. बरं, आता सांगा कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचे ज्वलन पूर्ण झाले तर शेवटी काय शिल्लक राहते?