अनुवंशिकता व परिवर्तन

प्रस्तावना

views

04:00
तुम्ही बऱ्याच वेळा वडिलधा-या माणसांकडून ऐकत असाल की एखादया मुलामध्ये किंवा मुलीमध्ये आई-वडिलांचे गुण आहेत किंवा आजी–आजोबांचे गुण आहेत. तो वडलांवर गेला आहे, असे म्हणतात ना? हे गुण या मुला–मुलींमध्ये आनुवांशिकतेने येत असतात. काही व्यक्तींमध्ये नाक, डोळे किंवा चेहऱ्याची ठेवण आई–वडील, आजी–आजोबा, आत्या, यांच्याशी जुळणारी असते. हे घडते ते ‘आनुवांशिकतेमुळे’. म्हणजे सर्वांना नाक, डोळे, कान, असे अवयव असतात. परंतु त्यांमध्ये म्हणजेच त्यांच्या ठेवणीमध्ये फरक असतो. अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला एकाच प्रजातीमध्ये खूप विविधता असते. परंतु हीच विविधता नेमकी कशामुळे निर्माण होते? उदा. मुले ही एकाच प्रजातीतील असतात. परंतु ती वेगवेगळी दिसत असतात. हेच सजीवांतील वेगळेपण आपण या पाठात अभ्यासणार आहोत.