अनुवंशिकता व परिवर्तन Go Back आनुवंशिकता views 05:28 तुम्ही तुमच्या आजूबाजूला प्राणी, पक्षी पाहिले असतील. उदा. कुत्रा: कुत्र्याची पिल्ले ही कुत्र्यासारखीच दिसतात. चिमणीची, कबुतराची पिल्ले ही त्यांच्यासारखीच दिसतात. तर मानवाची संतती ही मानवासारखीच दिसते. म्हणजेच माता-पित्याची शारीरिक आणि मानसिक जैविक लक्षणे जनुकांद्वारे संततीमध्ये वा पुढील पिढीत संक्रमित होतात. यालाच आनुवंशिकता असे म्हणतात. या आनुवंशिकतेमुळे प्रत्येक सजीवांची संतती त्यांच्याप्रमाणेच होते. आनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण: आता आपण आनुवंशिक लक्षणे व या लक्षणांचे प्रकटीकरण कसे होते ते पाहूया. आई-वडील व त्यांच्या संततीमध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या आढळून येतात पण भेदही आढळून येतात. हे सर्व आनुवंशिकतेमुळेच घडून येते. तर सांगा बरं सजीवांमध्ये विशिष्ट लक्षणे अथवा वैशिष्ट्ये कशी प्रकट होतात? प्रस्तावना आनुवंशिकता डी.एन.ए आर.एन.ए. (Ribo Nuclic Acid) मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग मेंडेलची द्विसंकर संतती (Dihybrid Cross) अनुवंशिक विकृती राष्ट्रीय आरोग्य अभियान सिकलसेल आजार तंतुकणिकीय विकृती