जैवतंत्रज्ञानाची ओळख Go Back वनस्पती ऊती views 04:23 प्राण्यांची वाढ ही ठरावीक वयापर्यंत होते व शरीराच्या सर्व भागात सारखीच होते. मात्र वनस्पती वाढ ही अमर्याद असते. ती सगळीकडे सारखीच होत नाही. वनस्पतींची वाढ ठरावीक ठिकाणीच का होत असते? वनस्पतींची वाढ ही त्यांच्या मूळ व खोडांच्या अग्रभागी दिसून येते. याचे कारण म्हणजे अग्रभागात वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ऊती असतात. पेशीच्या विभाजन क्षमतेनुसार वनस्पती ऊतींचे विभाजी ऊती व स्थायी ऊती असे वर्गीकरण केले जाते. जेथे विभाजी ऊती असतात तेथेच वाढ होत असते. आता ही बाजूची आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन वायूपात्रे घ्या व त्यावर एक-एक कांदा तळाच्या भागाकडून पाण्यात बुडेल असा ठेवा. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी दोन्ही कांद्यांच्या मुळांची लांबी मोजून नोंद घ्या. चौथ्या दिवशी दुसऱ्या वायूपात्रातील कांद्याची मुळे ही 1 सेमी ने कापा. पुढील पाच दिवस दोन्ही कांद्यांच्या मुळांची लांबी दररोज मोजून पुढीलप्रमाणे तक्त्यात नोंदी केल्या आहेत त्यावरून प्रश्नांची उत्तरे द्या. प्रस्तावना प्राणी ऊती संयोजी ऊती स्नायूऊती वनस्पती ऊती स्थायी ऊती जैवतंत्रज्ञान जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले बदल कृषी पर्यटन कुक्कुटपालन