सांख्यिकी

वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक

views

04:57
वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक: दिलेल्या प्राप्तंकात जास्तीत जास्त वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या समूहाचा बहुलक असतो हे आपण जाणतो. उदाहरणार्थ, एखादी दुचाकी उत्पादक कंपनी विविध रंगांमध्ये दुचाकी गाड्या तयार करते. कोणत्या रंगाच्या गाड्यांची पसंती सर्वाधिक आहे हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीला रंगाचे बहुलक माहीत असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे विविध उत्पादने असणाऱ्या एखाद्या कंपनीला सर्वाधिक मागणी कोणत्या उत्पादनासाठी आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता वाटेल, अशा वेळी त्या उत्पादनाचा बहुलक काढावा लागेल.