सांख्यिकी Go Back गृहीतमध्य पद्धती views 03:48 गृहीतमध्य पद्धती: मुलांनो, सरळ पद्धतीत आपण जी उदाहरणे सोडविली त्या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते, की कधी-कधी X_i F_i ( X_i गुणिले F_i ) हा गुणाकार खूप मोठी संख्या येते. त्यामुळे सरळ पद्धतीने मध्य काढणे थोडे कठीण होते. त्यासाठी आणखी एक पद्धत वापरली जाते. तिला ‘गृहीतमध्य पद्धती’ म्हणतात. तिची माहिती आता आपण घेऊ. या पद्धतीने मध्य काढताना लहान संख्यांची बेरीज व भागाकार केल्यामुळे काम सोपे होते. उदाहरणार्थ: 40,42,43,45,47,48 हे प्राप्तांक आहेत. यांचा मध्य काढायचा आहे. या उदाहरणातील संख्यांचे निरीक्षण केल्यास आपल्या असे लक्षात येते, की या सामग्रीचा मध्य 40 पेक्षा जास्त आहे. म्हणून आपण 40 ही संख्या मध्य मानू. ही संख्या गृहीत धरलेली आहे म्हणून हा गृहीतमध्य आहे. प्रस्तावना वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य गृहीतमध्य पद्धती वारंवारता सारणीसाठी वापरली जाणारी पद्धत मध्यप्रमाण विचलन पद्धती जरा आठवूया वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक सोडवलेली उदाहरणे वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक सांख्यिक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण वारंवारता बहुभूज वृत्तालेख वृत्तालेख काढणे