सांख्यिकी

मध्यप्रमाण विचलन पद्धती

views

05:13
मध्यप्रमाण विचलन पद्धती: आपण मध्य काढण्याच्या सरळ पद्धती व गृहीतमध्य पद्धती यांचा अभ्यास केला. अधिक सुलभतेने मध्य काढण्याची आणखी एक पद्धत आहे. ती म्हणजे मध्यप्रमाण विचलन पद्धती. ती आता आपण एका उदाहरणातून समजून घेऊ. प्रथम A हा गृहीतमध्य वजा करून d_i चा स्तंभ तयार करू. सर्व d_i चा मसावि g हा सहज मिळत असेल तर u_i = (d_i )/g यांचा स्तंभ तयार करू. उदाहरण: 100 कुटुंबांनी आरोग्यविम्यासाठी गुंतवलेली रक्कम वारंवारता सारणीत दिली आहे. मध्य प्रमाण विचलन पद्धतीने कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा मध्य काढा.