सांख्यिकी

प्रस्तावना

views

03:57
प्रस्तावना: मुलांनो, मागील पाठात आपण संभाव्यतेचा सविस्तर अभ्यास केला होता. या पाठात आपण संख्यिकीविषयी काही माहिती घेऊया. ‘‘सांख्यिकी म्हणजे संख्यात्मक स्वरूपात दर्शविलेल्या माहितीचे संग्रहण होय.’’ सांख्यिकीचा संबंध संग्रहण, वर्गीकरण, वर्णन, गणिती विश्लेषण आणि संख्यात्मक घटनांचे परीक्षण या क्रियांशी असतो. इंग्लिशमध्ये सांख्यिकी म्हणजे Statistics. मानवी जीवनात सांख्यिकी अनेक शाखांत उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ शेती, अर्थशास्त्र, वाणिज्य, औषधशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, व्यवस्थापन इत्यादी. एखाद्या प्रयोगानंतर मिळणाऱ्या निष्पत्तींच्या अनेक शक्यता असतात. जेव्हा एखादी शक्यता तपासायची असते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर प्रयोग करून, विविध निष्प्तींच्या संभाव्यता तपासता येतात. यासाठी संख्याशास्त्रात म्हणजेच संख्यिकीत नियम तयार केले आहेत.