धाराविद्युत

प्रस्तावना

views

3:06
आज आपण जिकडे तिकडे विजेचा वापर करत असतो. आपल्या आजच्या रोजच्या जीवनाचा विचार केला तर आपण पूर्णपणे विजेवरच अवलंबून आहोत की काय? असे वाटायला लागते. इतकी वीज ही आपल्यासाठी जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. काही ठिकाणी शहरी भागात उन्हाळ्यात लोडशेडिंग असते तेव्हा ५ ते ६ तास वीज नसते. अशा वेळी घरात इनवरटर वापरतात. म्हणजे विजेशिवाय आपण जास्त वेळ राहूच शकत नाही. म्हणून घरगुती इनवरटरच्या मदतीने वीज साठवून आपण तिचा वापर करतो. तसेच वीज नसताना तिला पर्यायी अशा काही व्यवस्था आपण निर्माण केल्या आहेत. दवाखाने, बँका, कार्यालये, अशा अनेक ठिकाणी वीज गेल्यानंतर जनित्राचा म्हणजे generator चा वापर केला जातो. विविध उद्योगधंद्यांमध्येही जनित्रांचा किंवा विद्युत चलित्राचा म्हणजेच motor चा वापर होताना आपण पाहतो. केवळ माणसांनाच विजेची गरज भासते असे नाही, तर काही प्राणीसुद्धा विजेचा वापर करतात. ‘ईल’ नावाचा मासा त्याचे भक्ष्य पकडण्यासाठी आणि स्वत:च्या रक्षणासाठी विजेचा वापर करतो. तुम्ही आकाशात वीज चमकताना पाहिली असेल. ही कधी कधी पृथ्वीवर येते तेव्हा आपण वीज पडली असे म्हणतो. ही वीज नैसर्गिक विद्युत प्रवाहाचे चांगले उदाहरण आहे.