सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-2)

अलैंगिक प्रजनन

views

6:11
अलैंगिक प्रजननात युग्मकनिर्मिती होत नसते. म्हणजेच ‘युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय.’ दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असते. म्हणून निर्माण होणारा नवीन सजीव अगदी मूळ सजीवांसारखाच तंतोतंत असतो. या प्रजनन पद्धतीत एका जनकापासून नवीन जीवनिर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. अशाप्रकारे अलैंगिक प्रजनन क्रिया घडून येते. जननिक विचरणाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा आहे तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. म्हणजेच पिढ्यानपिढ्या होणाऱ्या अलैंगिक प्रजननामुळे त्या जीवाच्या जाती वैशिष्ट्यांमध्ये बदल होण्याची क्षमता खुंटते. तर प्रत्येक जीव जननक्षम असतो त्यामुळे प्रजनननाचा दर वाढतो.