सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-2)

प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान

views

3:11
आपण प्रजनन क्रियेत आधुनिक तंत्रज्ञान कसे उपयोगी पडते, ते समजून घेऊ. बऱ्याच दाम्पत्यांना अपत्ये होत नाहीत. त्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. जसे स्त्रियांच्या मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशीच्या निर्मितीतील अडथळे, गर्भाच्या रोपणक्षमतेमध्ये असणारे अडथळे. अशा कारणांमूळे स्त्रीप्रजजन संस्थेवर परिणाम होतो. तर पुरुषांमध्ये वीर्यात शुक्रपेशींची कमतरता, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशीत असणारे व्यंग या कारणांमुळे अपत्य निर्मितीत अडचण येते. ही अडचण वैद्यकशास्त्रामध्ये दूर करता येते. जसे IVF, भाडोत्री मातृत्व, वीर्य पेढी या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता अपत्ये होऊ शकतात. IVF म्हणजे In vitro fertilisation ज्यात स्त्रीबीज आणि शुक्राणू अतिशय प्राथमिक अशा कल्चर कंडिशन्स’ मध्ये ठेवून गर्भ तयार करतात. यालाच टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. काचनलिकेत दोन युग्मकांचे फलन घडवले जाते. आणि तयार झालेला भ्रूण हा स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशीचे प्रमाण कमी असेल किंवा अंडपेशी अंडनलिकेत प्रवेश करू शकत नसतील तर IVF हे तंत्रज्ञान वापरून अपत्यनिर्मिती केली जाते. भाडोत्री मातृत्व: बऱ्याच स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते. त्यामुळे भाडोत्री मातृत्व ही पद्धत वापरून अपत्यनिर्मिती करता येते. या पद्धतीमध्ये स्त्रीचे गर्भाशय रोपणक्षम नसेल तर स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी घेतली जाते. अंडपेशीचे काचनलिकेमध्ये त्या स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशी घेऊन फलन घडवले जाते. या फलनातून तयार झालेले भ्रूण दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. हे भ्रूण ज्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते त्या स्त्रीला भाडोत्री माता (Surrogate mother) असे म्हणतात.