सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-2)

जुळे

views

4:40
तुम्ही तुमच्या आजूबाजूला जुळी मुलं पहिली असतील. त्यांना पाहून आपल्यालाही फारच नवल वाटते. तर ही जुळी मुलं नेमकी कशी होतात? हे आपण जाणून घेऊ. गर्भाशयामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होते व दोन अपत्ये जन्मास येतात. अशा अपत्यांना ‘जुळी अपत्ये’ म्हणतात. अशा जुळ्या अपत्यांचे मुख्य दोन प्रकार असतात. एकयुग्मजी आणि द्वियुग्मजी जुळे. एकयुग्मजी जुळे: एकयुग्मजी जुळी अपत्ये ही एक अंडपेशी व एक शुक्रपेशी यांच्यापासून तयार होणाऱ्या एकाच युग्मनजापासून तयार झालेली समान लिंगाची असतात. ही जनुकीय दृष्ट्या सारखीच असतात. युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसांच्या आत पेशी अचानक दोन गटांत विभाजित होतात. हे भ्रूणपेशींचे दोन्ही गट वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढतात आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर एकयुग्मजी जुळे जन्माला येतात. या दोन्ही भ्रूणातील गुणसूत्रे आणि त्यावरील जनुके एकाच पेशीपासून तयार झालेली असल्यामुळे दोन्ही मुलांचे लिंग सारखेच असते. त्यांच्यात कमालीचे साधर्म्य असते. या एकयुग्मजी जुळ्यांबाबत भ्रूणपेशीची विभागणी युग्मज तयार झाल्यानंतर 8 दिवसांनंतर झाली तर सयामिज जुळे जन्माला येतात. अशी ही जुळी मुले शरीराचे काही भाग एकमेकांच्या शरीराला जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. अशा जुळ्यांमध्ये काही अवयव सामाईक असतात.