सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-2)

परागीभवनाच्या पद्धती

views

4:09
) स्वंयपरागण: जेव्हा झाडाच्या एकाच फुलामध्ये किंवा एका झाडाच्या दोन फुलांमध्ये परागण होते तेव्हा त्यास स्वंयपरागण असे म्हणतात. 2) परपरागण: एकाच जातीच्या दोन वेगवेगळ्या वनस्पतींमधील फुलांमध्ये घडून येणारी परागण क्रिया म्हणजेच परपरागण क्रिया होय. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने भरपूर उत्पन्न देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी काही वनस्पतींच्या नवीन जाती निर्माण केल्या जातात. त्यावेळेस शास्त्रज्ञ ब्रशच्या साहाय्याने परपरागीभवन घडवून आणतात. या परपरागीभवनाच्या पद्धती आहेत. बीजांकुरण: मुलांनो, आता आपण बीजांकुरणाविषयी माहिती करून घेऊया. बीज अंकुरल्यानंतर नवीन रोपटे तयार होते त्याला ‘बीजांकुरण’ असे म्हणतात. फलनानंतर बीजांडाचे बीजात व अंडाशयाचे फळात रूपांत होते. अनुकूल परिस्थितीत जमिनीवर पडलेली बीजे मातीत रुजतात. बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनजाची वाढ होते व नवीन रोपटे तयार होते. आपल्या घरामध्येही आपण दहा-बारा दाणे मातीत रुजवले व त्यास योग्य प्रमाणत पाणी दिले की हळू हळू त्यातून रोपटे तयार होताना दिसते.