सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-2)

युग्मक निर्मिती

views

3:41
पित्याकडून येणारे युग्मक हे शुक्रपेशी म्हणजेच शुक्राणू असतात. तर मातेकडून येणारे युग्मक म्हणजे अंडपेशी. ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून ते मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केल्या जातात. स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी त्याच्या अंडाशयात 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात. मात्र स्त्रीच्या अंडाशयात यौवनावस्थेपासून ते रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजेच साधारण 45 वर्षांपर्यंत दर महिन्याला एकाच अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य हे वयानुसार थांबत असते. यालाच रजोनिवृत्ती असे म्हणतात. साधारणत: 40 ते 50 वर्षापर्यंत स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्त्रवणे थांबते. यामुळे रजोनिवृत्ती येते. यौवनावस्थेपासून दर महिन्याला एक अंड पेशी ही अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत साधारणपणे केवळ चारशेच अंडपेशी ह्या अंडाशयातून बाहेर पडतात व बाकी अंडपेशी नष्ट होतात.