सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-2)

मानवी पुरुष प्रजनन संस्था

views

3:02
मानवी पुरुष प्रजनन संस्था वृषण, विविध वाहिन्या/नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते. यातील वृषण हे उदर पोकळीच्या बाहेर वृषणकोषामध्ये असते. वृषणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शुक्रजनन नलिका असतात. त्यामध्ये जनपद अधिस्तराच्या पेशी ह्या अर्धसूत्री विभाजनाने विभाजित होतात. आणि शुक्रपेशी तयार करतात. या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे पुढे पाठविल्या जातात. या नलिकांचा क्रम पुढीलप्रमाणे आढळून येतो: वृषणजालिका, अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलन वाहिनी, मूत्र-जनन वाहिनी इत्यादी. शुक्रपेशी जस-जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात, तसतशा त्या परिपक्व होऊन फलन करण्यास पात्र होतात. शुक्राशयाचा स्त्राव हा स्खलन ग्रंथीमध्ये स्त्रवला जातो. तर पुःरस्थ ग्रंथी आणि काऊपर्स ग्रंथी त्यांचा स्त्राव मूत्र जनन वाहिनीमध्ये स्त्रवतात. हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू मिळून 'रेत' म्हणजेच वीर्य (semen) तयार होते. हे रेत शिश्नाच्या (penis) मदतीने बाहेर सोडले जाते. या प्रजननसंस्थेमध्ये मूत्रजनन वाहिनी व शिश्न हा एक अवयव असतो, बाकी उरलेल्या सर्व अवयवांची एक-एक जोडी असते.