सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-2)

आ. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन

views

4:31
आता आपण बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाविषयी माहिती घेऊ. 1) खंडीभवन: बहुपेशीय सजीवांमध्ये खंडीभवन या अलैंगिक पद्धतीने प्रजनन होत असते. या प्रकारामध्ये जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन नवीन जीव तयार होतात. उदा. शैवाल, स्पायरोगायरा, सायकॉन यांसारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये असे प्रजनन होते. स्पायरोगायरा या सजीवाला जेव्हा मुबलक प्रमाणात पाणी व पोषकद्रव्ये मिळतात तेव्हा त्याच्या तंतूंची वाढ वेगाने होत जाते. या तंतूंचे छोट्या-छोट्या तुकड्यात खंडीभवन होते व स्पायरोगायराचा नवीन तंतूं निर्माण होतो. सायकॉनचे छोटे-छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो. आता ही आकृती पहा: याठिकाणी स्पायरोगायराला मुबलक पाणी व पोषक द्रव्ये मिळाल्याने त्यातील तंतूंची वाढ होऊन ते तंतू छोट्या तुकड्यात खंडित झालेले दिसतात. 2) पुनर्जनन: पुनर्जनन प्रक्रियेमध्ये सजीव स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात. आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उरलेला भाग तयार केला जातो. पाल आपली शेपटी तुटल्यानंतर कालांतराने पुन्हा नवीन शेपटी तयार करते, हे तुम्हाला माहित असेल. मात्र हा मर्यादित पुनर्जनन प्रक्रियेचा प्रकार आहे. परंतु प्लानेरियासारखे सजीव हे विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात. त्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन जीव निर्माण होतो. यालाच पुनर्जनन असे म्हणतात. पहा प्लानेरीयाच्या स्वत:च्या शरीराचे दोन भाग झालेले असून त्यापासून दोन नवजात जीव तयार झालेले आहेत.