सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-2)

अ. वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन

views

4:22
वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननाचा मुख्य घटक म्हणजे फूल. या फुलालाच कार्यात्मक एकक मानले जाते. यामध्ये बाहेरून आत या क्रमाने निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग अशी चार मंडले असतात. या मंडलातील पुमंग व जायांग हे प्रजननाचे कार्य करतात, म्हणून त्यांना 'आवश्यक मंडले' असे म्हणतात. तर, निदलपुंज व दलपुंज हे आतील मंडलाचे संरक्षण करतात. म्हणून त्यांना 'अतिरिक्त मंडले' असे म्हणतात. निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात व ते हिरव्या रंगाचे असतात. तर दलपुंजातील घटकांना 'पाकळ्या' म्हणतात आणि त्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. येथे पुमंग व जायांग दाखवले आहेत. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणतात. तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर म्हणतात. ज्या फुलांमध्ये पुमंग व जायांग ही दोन्ही मंडले असतात त्या फुलांना उभयलिंगी असे म्हणतात. उदा. जास्वंदी. जर एखाद्या फुलामध्ये पुमंग आणि जायांग या दोन्हींपैकी एकच मंडळ असेल तर त्या फुलाला 'एकलिंगी' फूल म्हणतात. यात जर फक्त पुमंग असेल तर 'नरफूल' व 'जायांग' असेल तर ते 'मादी फूल' असते. उदा. पपई. ज्या फुलांना आधारासाठी देठ असतो त्या फुलांना 'पुष्पवृंत' असे म्हणतात. तर देठ नसणाऱ्या फुलांना 'स्थानबद्ध' फुले असे म्हणतात. प्रत्येक पुंकेसराला एक 'वृंत' असते व त्याच्या टोकावर परागकोश असतो. या परागकोशामध्ये चार कप्पे असतात. त्यांना कोष्ठक म्हणतात. अर्धसूत्री विभाजनाने या कोष्ठकामध्ये परागकण तयार होतात. विशिष्ट परिस्थितीमध्ये हे परागकोश फुटतात व आतील परागकण बाहेर येतात. जायांगाचे घटक दल म्हणजेच स्त्रीकेसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळापाशी अंडाशय असते. अंडाशयाच्या वरच्या बाजूने कुक्षीवृंत निघते. ह्या कुक्षीवृंताच्या टोकाला एक कुक्षी असते. अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांडे असतात. या प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनामुळे भ्रूणकोष तयार होतो.