सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-2)

लैंगिक प्रजनन

views

2:34
जे प्रजनन युग्मकांच्या साहाय्याने होते त्यास लैंगिक प्रजनन म्हणतात. स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक या दोन जनक पेशींच्या मदतीने लैंगिक प्रजनन होते. उदा. मानव, मांजर या प्राण्यांतील प्रजनन. लैंगिक प्रजनन हे दोन प्रक्रियेने घडून येते त्या पुढीलप्रमाणे आहेत: 1) युग्मक निर्मिती: एकगुणित अर्धसूत्री विभाजनामुळे गुणसूत्रांची संख्या निम्मी होते व अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. म्हणजेच जनक पेशी एकगुणी असतात. 2) फलन: एकगुणी स्त्रीयुग्मक व एकगुणी पुंयुग्मक यांचा संयोग होऊन द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. या प्रक्रियेला फलन असे म्हणतात. हा युग्मनज सूत्री विभाजनाने वेगळा होऊन भ्रूणापासून नवीन जीव तयार होतो. या लैंगिक प्रजननामध्ये नर जनक आणि मादी जनक या दोघांचाही सहभाग असतो. नर जनकाच्या पुंयुग्मकाचा मादी जनकाच्या स्त्रीयुग्मकाशी संयोग होतो. त्यातून तयार होणाऱ्या नवीन जीवात दोन्ही जनकांची जनुके आढळतात. त्यामुळे तयार झालेल्या नवीन जीवात काही गुणधर्म हे त्याच्या जनकांच्या गुणधर्माप्रमाणे असतात, तर काही वेगळे असतात. सजीवांमध्ये जी विविधता दिसून येते ती जननिक बदलामुळे. जननिक बदलामुळे सजीवांमध्ये अनुकूलन घडून आल्यामुळे सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व त्याचे अस्तित्व टिकवण्यास मदत होते. जननिक बदलामुळे प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवू शकतात. अशाप्रकारे युग्मक निर्मिती व फलन या क्रिया खूप महत्त्वाच्या ठरतात.