सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-2)

विकास व जन्म

views

5:18
युग्मनजाचे अंडनलिकेमध्ये फलन झाल्यानंतर अनेक वेळा सूत्री विभाजन होते व त्यापासूनच भ्रूण तयार होतो. हा भ्रूण गर्भाशयाच्या दिशेने पुढे सरकतो व तेथे पोहोचल्यानंतर त्याचे रोपण म्हणजेच त्यांची वाढ व विकास होतो. नऊ महिन्यापर्यंत त्या भ्रूणाचा विकास होतो. नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये भ्रूणाची वाढ होते. या आकृतीत आठवड्यानुसार भ्रूणाची होणारी वाढ दाखवली आहे. 36 आठवडे म्हणजेच नऊ महिन्यात बाळाची पूर्ण वाढ होते. भ्रूणाच्या या वाढीमध्ये अन्नपुरवठा करण्यासाठी ‘अपरा’ (Placenta) नावाचा अवयव तयार होतो. याद्वारे भ्रूणाच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात अन्नपुरवठा केला जातो. अशाप्रकारे भ्रूणाचा विकास होतो. तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडे मुलगा व मुलगी यांमध्ये नेहमी भेद केला जातो. एखाद्या दाम्पत्याला मुलगी झाली की त्या स्त्रीलाच दोष दिला जातो. पण मुलगा किंवा मुलगी होणे हे पूर्णपणे पुरुषावर अवलंबून असते. कारण ज्यावेळेस युग्मकांची निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडून x किंवा y गुणसूत्र हे पुढील पिढीमध्ये पाठवले जाते. मात्र स्त्रीकडून फक्त x हेच गुणसूत्र येते. फलनाच्या क्रियेमधून जर x गुणसूत्र आले तर मुलगी होते. व y गुणसूत्र आले की मुलगा होतो. म्हणजेच मुलगा किंवा मुलगी होणे हे पुरुषावर अवलंबून असते. यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे चुकीचे आहे. आपल्या समाजात होणाऱ्या स्त्री- भ्रूण हत्या आपण थांबवल्या पाहिजेत. हे एक सामाजिक कर्तव्य आहे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत.