बल व दाब

घर्षण बल

views

3:49
तुम्ही एखादा चेंडू टेबलावर ठेवला व त्याला हलकासा धक्का मारला तर तो चेंडू पुढे जाऊन संथ होत होत थांबतो तसेच सपाट रस्त्यावरून जाताना मोटारगाडीचे इंजिन बंद केले तर मोटारगाडी थोड्या अंतरावर जाऊन थांबते. असे का घडते? कारण टेबलाचा व जमिनीचा पृष्ठभाग व त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यामधील घर्षण बलामुळे चेंडू व मोटारगाडी काही अंतरावर जाऊन थांबतात. जर हे घर्षण बल नसते तर न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमान राहिली असती. घर्षण बलाचा आपणही रोजच्या जीवनात उपयोग करतो. आपण जमिनीवर चालतो तेव्हा आपली पावले व जमीन यांमध्ये घर्षण बल प्रयुक्त होते, म्हणून आपण नीट चालू शकतो. अन्यथा आपण जमिनीवरून घसरून पडलो असतो. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त होत असते. तसेच गतीच्या विरुद्ध दिशेनेही प्रयुक्त होत असते. रस्त्यावरून चालताना केळीच्या सालीवरून पाय घसरून पडायला होते. किंवा चिखलावरून पाय घसरून माणूस पडतो. म्हणजे याठिकाणी घर्षण बल कमी झाले म्हणून असे घडते.