बल व दाब

आर्किमिडीजचे तत्त्व

views

5:14
आता आपण आर्किमिडीजचे तत्त्व काय सांगते ते पाहूया. हे तत्व असे आहे: एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशत: अथवा पूर्णता बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्यावस्तूने बाजूस सरलेल्या द्रायुच्या वजनाइतके असते. 287 ख्रिस्तपूर्व ते 212 ख्रिस्तपूर्व हा आर्किमिडीज या ग्रीक शास्त्रज्ञाचा जीवनकाळ आहे. आर्किमिडीज हे प्रखर बुद्धिमत्ता असलेले गणिती तज्ञ होते. त्यांनी π (पाय) चे मूल्य आकडेमोड करून काढले. भौतिकशास्त्रातील तरफ, कप्पी, चाके, यासबंधीचे त्यांचे ज्ञान हे ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना खूप उपयोगी ठरले. भूमिती व यांत्रिकीमधील त्यांच्या कामामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. एकदा बाथटबमध्ये ते स्नान करण्यासाठी उतरले तेव्हा बाहेर सांडणारे पाणी त्यांनी पाहिले व त्यांना वरील तत्वाचा शोध लागला. ‘युरेका, युरेका’ म्हणजे ‘मला सापडले, मला सापडले’ असे ओरडत ते त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले. आर्किमिडीजचे तत्व अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम आपण एक प्रयोग करूया. प्रथम एक मोठा रबरबँड घेऊन तो एका बिंदूपाशी कापा. त्यानंतर एक दगड घेऊन तो स्वच्छ धुवून घ्या. किंवा 50gm चे वजन घेतले तरी चालेल. हे वजन रबरबँडच्या टोकापाशी बांधा. आता रबरबँडचे दुसरे टोक बोटांनी पकडून तेथे पेनने खूण करा. दगड हवेत लटकता ठेवून वरील खुणेपासून लटकत्या दगडापर्यंत रबरबँडची लांबी मोजा. आता एका पात्रात पाणी भरून दगड त्यात बुडेल अशा उंचीवर तो धरा. आता पुन्हा रबराची लांबी मोजा. या दोन्ही लांबींमध्ये तुम्हाला काय दिसून आला?