बल व दाब

स्थायूवरील दाब

views

3:06
हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतोच. स्थायूवर जर आपण एखादे वजन ठेवले तर त्या वजनामूळे स्थायूवर दाब पडत असतो. तो दाब त्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. आपण उभे असताना आपले वजन कमी क्षेत्रफळावर प्रयुक्त झाल्याने पायांच्या स्नायूंवरील ताण वाढतो. त्यामुळे आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही. आपण झोपतो तेव्हा आपले वजन जास्त क्षेत्रफळावर प्रयुक्त होते. त्यामुळे स्नायूंवरील ताण कमी होतो. म्हणून एकाच ठिकाणी आठ – आठ तास झोपू शकतो बर्फावरून घसरण्यासाठी पसरट फळ्या वापरल्यामुळे क्षेत्रफळ वाढते व दाब कमी होतो म्हणून फळ्या वापरल्या जातात. बलामुळे निर्माण होणारा दाब बल लावलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. म्हणजेच क्षेत्रफळ जेवढे जास्त असते, तेवढा दाब कमी होतो म्हणून बर्फावरून घसरायला पसरट फळ्या लागतात