बल व दाब

संतुलित आणि असंतुलित बले:

views

3:54
आता आपण संतुलित आणि असंतुलित बल म्हणजे काय ते समजून घेऊया. हे समजण्यासाठी एक प्रयोग करूया. सर्वप्रथम पुठ्ठयाचे एक खोके घ्या. त्याच्या दोन बाजूंना सुतळी किंवा जाड दोरा बांधून तो खोका टेबलाच्या पृष्ठभागावर ठेवा. आता दोरा टेबलाच्या दोन्ही बाजूंना खाली सोडून त्या दोऱ्याच्या टोकांना पारडी बांधा. या दोन्ही पारड्यांमध्ये सारख्याच वजनाच्या वस्तू ठेवा. आता तुम्हाला आता काय दिसते? दोन्ही पारडी एकसमान तरंगत आहेत. आणि त्यामुळे खोका एका जागेवर स्थिर आहे. अगदी बरोबर! सारख्याच वजनाच्या वस्तू दोन्ही पारडयांत आहेत, म्हणून खोका टेबलावर स्थिर आहे. आता एका पारडयातील थोडे वजन कमी करा. सांगा आता काय घडले? एक पारडे खाली आहे व खोका थोडा सरकला आहे. एखाद्या पारडयात अधिक वजन ठेवले तर टेबलावरील खोका सरकतो. तोही अधिक वजनाच्या पारडयाकडे. म्हणजेच पारडंयात एकसारखे वजन असेल तर दोन्ही पारड्यांवर समान गुरुत्वीय बल कार्य करत असते. म्हणजेच खोक्यावर संतुलित बले लावली जातात. ही बले विरुद्ध दिशेने असल्यामुळे त्याचे परिणामी बल शून्य होते व खोके एका जागेवर स्थिर राहते. या उलट जर एखाद्या पारडयात जास्त वजन ठेवले तर खोके जास्त वस्तुमानाच्या पारडयाच्या दिशेने सरकू लागते. कारण खोक्याच्या दोन्ही बाजूंना असमान बले लावल्यामुळे असंतुलित बल कार्यरत होते व त्या खोक्याला गति मिळते.