बल व दाब

द्रवाचा दाब

views

2:51
आता आपण एका प्रयोगाद्वारे द्रवाचा दाब समजून घेऊया. प्रथम एक प्लास्टिकची बाटली घ्या. एक रबरी फुगा ज्यावर बसेल अशा काचेच्या नळीचा साधारण 10 cm लांबीचा तुकडा घ्या. त्यानंतर नळीचे एक टोक थोडेसे गरम करून बाटलीच्या तळापासून 5cm वर बाटलीत एका बाजूने दाबून आत जाईल असे बसवा. पाणी गळू नये म्हणून नळीच्या बाजूने मेण तापवून लावा. आता बाटलीत थोडे – थोडे पाणी भरा. पाहा: जस जसे पाणी भरत जाल तस-तसा फुगा फुगत जातो. सांगा, या प्रयोगातून तुमच्या काय लक्षात आले. जसा पाण्याचा दाब वाढला तसा फुगा फुगत गेला. म्हणजेच पाण्याचा दाब हा बाटलीच्या बाजूवरही पडलेला दिसून येतो. एकाच पातळीतील दोन छिद्रांमधून पडणाऱ्या पाण्याच्या धारा बाटलीपासून सारख्याच अंतरावर पडतात. यावरून आपल्याला हे लक्षात येते की, एकाच पातळीतील द्रवाचा दाब एकच असतो व द्रवाच्या खोलीप्रमाणे तो दाब वाढत जातो.