बल व दाब

प्लावक बलावर आधारित प्रश्नोत्तरे

views

4:26
विहिरीतून पाणी वर काढताना दोराला बांधलेली बादली पाण्यात पूर्ण बुडालेली असताना जितकी हलकी वाटते, त्यापेक्षा ती पाण्यातून बाहेर काढताना जड का वाटू लागते? पाणी भरलेली बादली विहिरीत असताना तिच्यावर पाण्याकडून वरच्या दिशेने प्लावक बल प्रयुक्त होते. तर बादली पाण्यातून वर आली की तिच्यावरील प्लावक बल कमी होते. म्हणून बादली जड वाटते. बादली पाण्यात असताना बादलीवर कार्यरत एकूण बल = पाणी भरलेल्या बादलीचे वजन (परिमाण) – पाण्याने प्रयुक्त केलेले प्लावक बल (परिमाण) हे प्लावक बल द्रायूच्या घनतेशी समानुपाती असते. तसेच हवेची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा खूप कमी असते. त्यामुळे हवेचे प्लावक बल कमी असल्याने बादली पाण्यातून वर काढली की जड वाटू लागते. आता आपण एक अॅल्युमिनिअमचा लहान आकाराचा पातळ पत्रा एका बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये हलकेच बुडवू. यात तुम्हाला काय आढळून आले ते सांगा? अॅल्युमिनिअमचा पत्रा पाण्यात बुडतो. पत्र्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते, त्यामुळे पत्रा पाण्यात बुडतो. बरं, आता हा पत्रा वाकवून एक लहानशी बोट तयार करूया. आता ही बोट आपण पाण्यावर सोडूया. ही बोट पाण्यावर सोडल्यावर तुम्हाला काय आढळून आले बरं? बोट पाण्यावर तरंगताना दिसते.