बल व दाब

वातावरणीय दाब

views

3:15
आता आपण वातावरणीय दाब म्हणजे काय ते पाहूया. आपली पृथ्वी हवेने पूर्णपणे वेढलेली आहे. पृथ्वीच्या सभोवतालच्या हवेच्या या आवरणाला आपण वातावरण असे म्हणतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 16km उंचीपर्यंत वातावरण आढळून येते. त्यापुढेही सुमारे 400km उंचीपर्यंत विरळ स्वरुपात हवेचे आवरण आढळून येते. “हवेमुळे निर्माण झालेल्या दाबालाच वातावरणीय दाब असे म्हणतात.” वातावरणाचा दाब हा mbar किंवा hectopascal म्हणजेच (hpa) या एककामध्ये सांगितला जातो. वातावरणीय दाब हवेतील एखादया बिंदूवर सर्व बाजूंनी असतो. हा दाब कसा तयार होतो? तर एखादया बंदिस्त पात्रात हवा असल्यास हवेचे रेणू यादृच्छिक गतीने पात्राच्या बाजूंवर आदळतात. या आंतर क्रियेमध्ये पात्रांच्या बाजूवर बल प्रयुक्त होते. प्रयुक्त झालेल्या बलामुळे दाब तयार होतो. आपल्या डोक्यावरही वातावरणीय दाब असतो. परंतु आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा व रक्तवाहिन्यांमध्ये रक्त असते. त्यामुळे पाणी व वातावरणीय दाबाखाली आपण चिरडले जात नाही,