बल व दाब

जडत्व

views

3:40
एका प्रयोगाद्वारे आपण जडत्व हा गुणधर्म समजून घेऊ. एका लोखंडी स्टँडला एका दोऱ्याच्या साहाय्याने अर्धाकिलो ग्रॅमचे वस्तूमान लटकवून ठेवा. त्या वस्तूमानाला दुसरा दोरा बांधून लटकवत ठेवा. आता दुसरा दोरा झटका देऊन खाली ओढा. पाहा: दुसरा दोरा तुटला पण वस्तुमान खाली पडले नाही. जड वस्तुमान हलत नाही. आता आपण दुसरा दोरा हळू-हळू खाली ओढूया. आता पाहा: हा दोरा ओढल्यानंतर पहिला दोरा तुटला आणि वस्तुमान खाली पडले. असे झाले कारण पहिल्या दोऱ्यामध्ये वस्तुमानामुळे आलेला ताण होय. या दोन्ही प्रयोगांवरून आपल्या लक्षात येते की, वस्तू गतीच्या आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला तिचे जडत्व असे म्हणतात. ज्याप्रमाणे स्थिर वस्तू स्थिर राहते त्याप्रमाणे गतिमान वस्तू गतिशील राहते. म्हणजेच चेंडूला आपण धक्का दिला तर जोपर्यंत पुन्हा त्याच्यावर बल लावून त्याला आपण अडवत नाही वा अटकाव येत नाही तोपर्यंत तो घरंगळत राहतो. यावरून हेच म्हणता येईल की बाहेरून बल प्रयुक्त केले नाही तर स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू ही गतिमान स्थितीत राहते. जडत्वाचे प्रकार: विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व .