अणूचे अंतरंग

डाल्टनचा अणुसिद्धांत

views

6:02
ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये अणुसिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार त्याने ‘द्रव्य’ हे अणूंचे बनलेले असते, आणि अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात असे मत मांडले. एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकसमान असतात. तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात. त्यांचे वस्तुमान भिन्न असते. द्रव्य हे अणूंपासून बनलेल आहे. हे अणू आपल्याला वेगळेही करता येत नाहीत. आणि नाहीसेही करता येत नाहीत. एकाच मूलद्रव्यांचे अणू हे एकसमान असतात. तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमानही भिन्न असते, तसेच डाल्टनने काही विशिष्ट चिन्हांचा वापर करून मूलद्रव्ये दर्शवली. उदाहरणार्थ, तांबे, सल्फर, हायड्रोजन. डाल्टनच्या म्हणण्यानुसार अणू हा एक भरीव गोल आहे. त्यामुळे अणू हा एखादया कडक, भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला दिसून येतो व अणूचे वस्तुमान सर्वत्र एकसारखेच दिसून येते. मात्र जे. जे थॉमसन यांनी अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लावला. त्यामुळे डाल्टनच्या सिद्धांताला एक प्रकारचा धक्काच बसला. अणूंच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणाचे वस्तुमान हे हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते. या कणानांच ‘इलेक्ट्रॉन’ हे नाव देण्यात आले आहे. पदार्थ विद्युत प्रभार दृष्टया उदासीन असतात. याचाच अर्थ असा होतो की, पदार्थांचे रेणू हे ज्यांच्या रासयनिक संयोगाने बनतात ते अणू विद्युतप्रभार दृष्टया उदासीन असतात.