अणूचे अंतरंग

समस्थानिके

views

3:13
आता आपण समस्थानिकांविषयी माहिती अभ्यासूया. मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. अणुअंक हाच मूलद्र्व्याची रासायनिक ओळख आहे. निसर्गामध्ये काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक सारखाच असतो. परंतु अणुवस्तुमानांक मात्र विभिन्न असे अणू असतात. एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणुंना समस्थानिके म्हणतात. उदाहरणार्थ कार्बन, कार्बनची तीन समस्थानिके आहेत. ती म्हणजे C-12,C-13,C-14. समस्थानिकांचा अणुवस्तुमानांक12C, 13C, 14C या पद्धतीने दर्शवितात. समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते परंतु न्यूट्रॉन संख्या भिन्न असते समस्थानिकांचे उपयोग :- बऱ्याच क्षेत्रांत समस्थानिकांचा उपयोग होतो. काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यक क्षेत्र, संशोधन अशा विविध क्षेत्रांत समस्थानिकांचा उपयोग करतात: १. युरेनिअम – 235 चा उपयोग केंद्रकीय विखंडन व ऊर्जानिर्मितीसाठी केला जातो. २. कॅन्सरसारख्या आजारावर उपचार करण्यासाठी कोबाल्ट 60 अशा किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात केला जातो. ३. गॉयटर या थायरॉईड ग्रंथींच्या आजारावरील उपचारासाठी आयोडीन- 131 या समस्थानिकाचा उपयोग होतो. ४. तसेच किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमीनीखाली असलेल्या नळांमधील चीरा शोधण्यासाठी होतो. उदा: सोडियम 24.