अणूचे अंतरंग

संयुजा व इलेक्ट्रॉन संरूपण

views

6:55
एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजेच त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण होय. इलेक्ट्रॉनकडील ऊर्जा ही नेहमी त्या इलेक्ट्रॉनच्या कवचातील स्थानावर अवलंबून असते. म्हणजे इलेक्ट्रॉन ज्या कवचात आहे त्यानुसार त्याची उर्जा निश्चित झालेली असते. कवचातील इलेक्ट्रॉनच्या वितरणाची व्यवस्था पहिल्या कवचात सर्वात कमी व नंतरच्या कवचात वाढत जाते. पहिल्या कवचातील (Kकवच) इलेक्ट्रॉनांची उर्जा ही सर्वात कमी असते. त्यापुढील कवचांमधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा कवचक्रमांकाप्रमाणे वाढत जाते. अणूचे हे इलेक्ट्रॉन कवचाच्या कमाल धारकतेप्रमाणे तसेच ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार कवचांमध्ये आपले स्थान मिळवत असतात. अणूच्या बाह्यतम कक्षेत द्विक अथवा अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी किंवा अणूची बाह्यतम कक्षा स्थिर होण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची ‘संयुजा’ होय.