अणूचे अंतरंग

रूदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप (1911)

views

5:11
आता आपण रूदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप जाणून घेऊया. अर्नेस्ट रूदरफोर्ड यांनी 1911 साली विकिरण प्रयोगांच्या आधारे अणूंच्या अंतरंगाचा वेध घेतला व इ.स 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले आहे. रूदरफोर्ड यांनी सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावर (∝) अल्फा कणांचा मारा केला. या चिन्हाला (∝) अल्फा असे म्हटले जाते. म्हणजेच रुदरफोर्ड यांनी सोन्याच्या पातळ पत्र्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा कणांचा (∝) मारा केला व कणांच्या मार्गाचे निरीक्षण केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, सोन्याच्या पत्र्याभोवती प्रतिदीप्तीमान पडदा लावूनही अल्फा कण (∝) हे पडदयाच्या आरपार गेले. त्यांना असे वाटले होते की पडद्यावर पडून अल्फा किरण परावर्तीत होतील. मात्र हे अल्फा कण पडदयाच्या आरपार गेले. त्यातील काही कण हे पत्र्यातून सरळ गेले तर काही अल्फा कण हे मूळ मार्गापासून लहान कोनांमधून विचलन झाले. तर काही अल्फा कणांचे (∝) मोठया कोनांतून विचलन झाले. आणि आश्चर्य म्हणजे २०००० कणांपैकी एक अल्फा (∝) कण हा मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. या निरीक्षणानंतर रूदरफोर्ड यांच्या लक्षात आले की, मोठया प्रमाणात अल्फा कण पडदयातून आरपार गेले. म्हणजेच त्या कणांच्या मार्गात कोणताही अडथळा नव्हता. याचाच अर्थ असा लावता येईल की, सोन्याच्या स्थायुरूप पत्र्यामधील अणूच्या आतील बरीच जागा ही मोकळीच असली पाहिजे, ज्या थोडया अल्फा कणांचे लहान किंवा मोठया कोनांतून विचलन झाले त्यांच्या मार्गात अडथळा आला. याचाच अर्थ असा लावण्यात आला की, अणूचा धनप्रभारित व जड भाग अणुच्या मध्यभागी होता.