अणूचे अंतरंग

जरा डोके चालवा

views

3:44
ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्या चार किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्येएवढी असते, याउलट ज्या मूलद्रव्यात चार किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात, ती उणीवेची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुजा असते. आता आपण मूलद्रव्याची संयुजा व मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण यातील संबध पाहूया. बरं सर्वप्रथम तुम्ही मला सांगा की, मूलद्रव्याचा अणुअंक (Z) म्हणजे काय? अणुमधील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुअंक म्हणतात व तो Z या संज्ञेने दाखवतात.