अणूचे अंतरंग

अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक

views

3:17
आपण अणुणूसंज्ञा, अणुअंक व अणूवस्तुमानांक हे एकत्रित दाखविण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात ती पाहूया. Az संज्ञा (Az संज्ञा म्हणजे एखाद्या संज्ञेत वरील बाजूस (A) अणुवस्तुमानांक व खाली (z) म्हणजेच अणुअंक दिलेला असतो.) उदा: 126C या चिन्हामध्ये कार्बनचा अणुअंक 6 आहे. म्हणजेच प्रोटॉनची संख्या ही 6 आहे. कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. यावरून आपण न्यूट्रॉनची संख्या काढू शकतो. 12-6=6 न्यूट्रॉन. ऑक्सिजनची संज्ञा ‘O’आहे व त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन व 8 न्यूट्रॉन असतात. तर यावरून ऑक्सिजनचा अणुअंक Z व अणुवस्तुमानांक (A) किती आहे व त्याची चिन्हांकित संकेताने मांडणी कशी कराल? अणुवस्तुमानांक = प्रोटॉन + न्यूट्रॉन = 8 + 8 अणुवस्तुमानांक = 16 अणुअंक प्रोटॉनची संख्या = 8, चिन्हांकित संकेत= AZOऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक 16 असून अणुअंक 8 आहे. (Z) = अणुअंक, प्रोटॉनची संख्या=8, ( A)= अणुवस्तुमानांक=16 ∴ चिन्हांकित संकेत= 168O