अणूचे अंतरंग

बोरचे स्थायी कक्षा अणूप्रारूप (1913)

views

4:37
आता आपण नील्स बोर यांनी मांडलेल्या अणुप्रारूपाची माहिती घेऊ या. डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी 1913 मध्ये स्थायीकक्षा अणुप्रारूप मांडले व त्यातून त्यांनी अणूचा स्थायीभाव स्पष्ट केला आहे. आपण आता बोरच्या अणुप्रारूपाची महत्त्वाचो आधार तत्वे अभ्यासणार आहोत: 1)अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अशा अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. 2) विशिष्ट कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. 3) इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरकाइतक्या उर्जेचे शोषण करतो. व बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरकाइतकी उर्जा उत्सर्जित करतो. नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडले आहे. घरातील गॅसची शेगडी पेटवल्यानंतर निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे म्हणजेच (सोडियम क्लोराईडचे) कण टाकल्यावर त्याच क्षणी त्या जागी तुम्हाला पिवळी ठिणगी दिसून येते. पाण्यामध्ये सोडियम धातूचा तुकडा टाकला तर तो पेटतो व त्याची ज्योत पिवळी दिसते. रस्त्यावरील सोडियम वेपरच्या दिव्यांचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की, त्या दिव्यांमधून येणारा प्रकाश हा पिवळ्या रंगाचा असतो. या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल की, सोडियम अणूमधील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषुन घेतो व बाहेरील कक्षेत प्रवेश करतो आणि पुन्हा आतील कक्षेमध्ये उडी मारून परत येताना ती ऊर्जा उत्सर्जित करतो. सोडिअम अणूच्या या दोन कक्षांच्या ऊर्जा पातळीतील फरक ठराविक असतात. हा फरक पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जेइतका असतो. म्हणूनच वरील उदाहरणांमध्ये विशिष्ट प्रकारचा पिवळा प्रकाश बाहेर पडताना दिसून येतो. अशाप्रकारे बोर यांनी अणूचे प्रारूप मांडले आहे. त्यानंतर आणखी काही प्रारूपे मांडण्यात आली आहे. पूंजयांत्रिकी या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुसंरचनेचा सखोलपणे व विस्ताराने अभ्यास करून काही मुलभूत तत्वे मांडली गेली आहेत.