अणूचे अंतरंग

इलेक्ट्रॉनचे वितरण

views

4:22
बोरने मांडलेल्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करत असतात. या कवचांना विशिष्ट अशी ऊर्जा प्राप्त झालेली असते. यामधील अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळच्या कवचाला पहिले कवच तर त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच असे म्हंटले जाते.कवचाच्या क्रमांकासाठी ‘n’ ही संज्ञा वापरली जाते. N=1,2,3,4………या क्रमांकानुसार कवचांना K,L,M,N….......अशा संज्ञा वापरल्या जातात. तसेच प्रत्येक कवचामध्ये 2n2 या सूत्रात किमती टाकल्यानंतर मिळालेल्या संख्ये इतके इलेक्ट्रॉन असतात. ज्याप्रमाणे n चे मूल्य वाढत जाते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते. अणुसंरचनेत विद्युत बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त बलवान असते. त्यामुळे गुरुत्व बलाकडे दुर्लक्ष केले जाते. तुम्हाला हे माहीत आहे की, केंद्रकात अनेक धनप्रभारित प्रोटॉन एकत्र असतात. केंद्रकातील केंद्रीय बल प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्र ठेवते. केंद्रकातील केंद्रीय बलाचे हे महत्त्वाचे कार्य आहे. K, L, M, N……. या कवचांमध्ये अनुक्रमे 2, 8, 18, 32……..इतके इलेक्ट्रॉन सामावू शकतात. यालाच कवचांची कमाल धारकता असे म्हणतात.